www.24taas.com, कोलकाता
लहान मुलांसाठी गाईचं दूध लाभदायक असतं, असे परंपरागत शब्द आपल्या कानावर नेहमीच पडत आलेले आहेत. पण, या समजुतीला खोटं ठरवत तज्ज्ञांनी मात्र गाईचं दूध लहान मुलांसाठी हानिकारक असल्याचं स्पष्ट केलंय.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजिन अँड पब्लिक हेल्थ या संस्थेमध्ये कार्यरत असलेले तज्ज्ञ देवनाथ चौधरी यांनी हा निष्कर्ष मांडला आहे. गाईच्या दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात, पण त्याचा मुलांना लाभ होण्याऐवजी हे प्रोटीन्स लहान मुलांच्या नाजूक किडनीला अपायकारक ठरतात. प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन्स मिळाल्यानं लहान मुलांची किडनी लवकर खराब होते, असं चौधरी यांनी स्पष्ट केलंय. जी आई आपल्या मुलांना अंगावरचं दूध देऊ शकतं नाही तिनं गाईच्या दुधाऐवजी अन्य पर्यायाचा विचार करावा, असं त्यांनी निष्कर्षाअंती सुचवलंय. तसंच बी. शशिदरन या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गाईच्या दुधात पोषक तत्त्वे फारच कमी प्रमाणात असून लोहाचं प्रमाणही कमी असतं. लहान मूल कमीत कमी एक वर्षाचं होईपर्यंत तरी आईनं त्यांना गाईचं दूध देऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
.