'आकाश'चं नवं व्हर्जन त्याच किमतीत!

जगातला सगळ्यात स्वस्त टॅबलेट पीसी असलेल्या आकाश मध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यावर त्यात सुधारणा करून नवं व्हर्जन बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना चांगला आणि उत्तम दर्जाचा टॅब त्याच किमतीत मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे .

Updated: Jan 14, 2012, 04:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जगातला सगळ्यात स्वस्त टॅबलेट पीसी असलेल्या आकाश मध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यावर त्यात सुधारणा करून नवं व्हर्जन बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येऊ घातलेल्या आकाश पीसीमध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचं निदर्शनास आलं होते. यातले सगळ्यात महत्त्वाच्या त्रुटी आकाशची बॅटरी लाईफ आणि त्याचं असत्यंत स्लो असणं. याची ट्रायल घेतल्यावर आकाशचं सुधारीत मॉडेल विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र ऑर्डर रद्द केली नसल्याचं सरकारने सांगितलं आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मॉडेलमधील बॅटरी, प्रोसेसर  आणि स्क्रीनशी संबंधित काही समस्या असल्यामुळे त्यात सुधारणा करून नवं मॉडेल बनवण्याची तयारी चालू आहे. सरकारने ‘डेटाविंड कंपनी’शी असलेला करार रद्द न करता त्यांना काही सुधारणा सुचवल्या आहेत. यावर सध्या कंपनी काम करत आहे.

 

आकाश बनवणाऱ्या डेटाविंड कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की आमच्यातला करार रद्द केलेला नाही. फक्त आमिही सध्याच्या मॉडेलवर काम करणं थांबवलं असून नव्या मॉडेलवर काम सुरू केलं आहे. हे नवं मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा चांगलं असेल. हे मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. कंपनीने यापूर्वी ३०,००० आकाश टॅबलेट्स सरकारला विकली होती. पण, उर्वरीत ७०,००० मॉडेल्स ही सुधारीत व्हर्जनची असतील. एकुण १ लाख मॉडेल्स सरकार विकत घेणार आहे.

 

 

विद्यार्थ्यांना चांगला आणि उत्तम दर्जाचा टॅब त्याच किमतीत मिळावा आणि ऑनलाईन किमतीतही त्यामुळे काही फरक पडू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे .