रिक्षाचालकांनाच नकोय भाडेवाढ...

प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षांची भाडेवाढ केल्यानंतरही रिक्षाचालक मात्र भाडेवाढ मान्य करायला तयार नसल्याचा अजब नमुना नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे. ग्राहक शेअर रिक्षासाठीची ठरवून दिलेली भाडेवाढ मान्य करायला तयार नाहीत.

Updated: Apr 27, 2012, 07:01 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षांची भाडेवाढ केल्यानंतरही रिक्षाचालक मात्र भाडेवाढ मान्य करायला तयार नसल्याचा अजब नमुना नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे. ग्राहक शेअर रिक्षासाठीची ठरवून दिलेली भाडेवाढ मान्य करायला तयार नाहीत तर रिक्षाचालक मीटरनं भाडे आकारण्यास तयार नाही. त्यामुळे भाड्याचा गुंता अधिकच वाढल्यानं नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

गेल्या दोन दशकात खर तर भाडेपत्रकाची नाशिककरांना सवयच राहिलेली नाही. रिक्षात सात आठ सीट्स, चालकाशेजारी प्रवाशी हि नाशिकची ओळख. आता नवीन भाडेवाढ लागू झालेल्या पत्रकात शालीमार ते नाशिक रोडसाठी वीस रुपये भाडे आकारणी करण्यात आली आहे. सिडको ते सातपूर या कामगार वर्गासाठी चक्क विविध सत्तावीस मार्गावर नवीन भाडे आकारणी प्रवाशांना जाचक वाटते आहे. महागाईने त्रस्त प्रवासीही नाविन भाडे देण्यास तयार नाही त्यामुळे रिक्षाचालक जुन्याचा भाड्यात सोयीस्कररित्या प्रवाशांना सेवा देणे पसंत करतात.

 

रिक्षाचालकाला क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून कमी भाडे आकारण्याची सवय प्रवाशांना लागली आहे.  प्रवाश्यांची मागणी आणि तुलनात्मक भाडे याचा मेळ रिक्षा संघटनाच्या सहमतीने घेतला असलयाचा दावा परिवहन विभागाने केला आहे. महिलाची होणारी कुचंबणा, सुरक्षेची पायमल्ली होत असल्याने नियामानावर बोट ठेवूनच आकारणी होत असल्याचं अधिकारी यांनी स्पष्ट केल आहे. राज्यात प्रथमच भाडेवाढ होऊनही रिक्षाचालक वाढ नको अशी भूमिका नाशिकमध्ये पाहायला मिळते आहे. रिक्षाचालक आणि परिवहन विभाग यांच्या घोळात नाशिककर मात्र संभ्रमित झाले आहेत. गरज आहे ती भाडे वाढीतील सुवर्णमध्य साधून प्रवाशांना दिलासा देण्याची आहे.