'सेंट्रल जेल'चा 'करोडपती' अधिकारी

इंदूरच्या सेंट्रल जेलचे अधिक्षक असणाऱ्या पी.बी. सोमकुंवर यांच्या इंदूर आणि भोपाळ येथील घरांवर घालण्यात आलेल्या छाप्यांमधून कोट्यावधी रुपयांची संमत्ती हस्तगत करण्यात आली आहे. हे धाडसत्र अद्याप चालूच आहे.

Updated: Mar 1, 2012, 01:22 PM IST

www.24taas.com, इंदौर

 

इंदूरच्या सेंट्रल जेलचे अधिक्षक असणाऱ्या पी.बी. सोमकुंवर यांच्या इंदूर आणि भोपाळ येथील घरांवर घालण्यात आलेल्या छाप्यांमधून कोट्यावधी रुपयांची संमत्ती हस्तगत करण्यात आली आहे. हे धाडसत्र अद्याप चालूच आहे. लोकायुक्तांनी या सेंट्रल जेल अधिकाऱ्याच्या घरावर छापा घातला होता.

 

या जेल अधिक्षकाकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याची माहिती मिळाली होती. या अधिकाऱ्याच्या घरात ३ कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. पैशांची मोजणी अद्याप चालू आहे.

 

पैशांव्यतिरिक्त या अधिक्षकाचे इंदूरमध्येच पाच फ्लॅट्स आणि तीन गाड्या आहेत. याशिवाय तीन गावांमध्ये १२ एकर जमीन आहे. मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्येही या अधिक्षकाची तीन घरं, दोन दुकानं आणि १ हॉस्टेल असल्याचं निदर्शनास आलं आहे.