पाणीपुरी प्रकरण भोवलं पुरोहितांना

ठाण्यातील एका पाणीपुरी विक्रेत्याकडून केलं जाणारं एक वाईट कृत्य अंकिताने आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात शूट केलं, ते फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर आणलं. राज पुरोहित यांनी दक्षिण मुंबईत एका जाहीर सभेत अंकिता राणेवर अश्लाघ्य शब्दात टीका केली होती.

Updated: Oct 20, 2011, 01:11 PM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

ठाण्याच्या अंकिता राणे या मुलीचं चारित्र्यहनन होईल अशी विधानं केल्याप्रकरणी भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष राज पुरोहित यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

ठाण्यातील एका पाणीपुरी विक्रेत्याकडून केलं जाणारं एक वाईट कृत्य अंकिताने आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात शूट केलं आणि ते फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर आणलं. त्यानंतर राज पुरोहित यांनी दक्षिण मुंबईत झालेल्या एका जाहीर सभेत अंकिता राणे वर अश्लाघ्य शब्दात टीका केली होती.

मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि अंकिता राणे यांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर आधारित कलम ३५४ अंतर्गत राज पुरोहित यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Tags: