राजेश खन्ना यांचा चित्रपट प्रवास!

मध्ये पहिल्यांदा त्यांनी 24 वर्षांचे असताना आखिरी खत नावाच्या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांनी राज, बहारों के सपने, औरत के रूप साऱखे चित्रपट केले.

Updated: Jul 18, 2012, 02:26 PM IST

www.24taas.com, मुंबई 

29 डिसेंबर 1942 ला अमृतसरमध्ये राजेश खन्ना यांचा जन्म झाला. त्याचे खरे नाव जतिन खन्ना आहे. 1966 मध्ये पहिल्यांदा त्यांनी 24 वर्षांचे असताना आखिरी खत नावाच्या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांनी राज, बहारों के सपने, औरत के रूप साऱखे चित्रपट केले.

 

 

परंतु, त्यांना खऱे यश 1969 मधील आराधनातून मिळाले. त्यानंतर त्यांनी एकानंतर एक अशा  14 सुपरहिट चित्रपट  देऊन बॉलिवुडमधील पहिला सुपरस्टार बनण्याची किमया केली.

 

 

1971 मध्ये राजेश खन्ना यांनी कटी पतंग, आनन्द, आन मिलो सजना, महबूब की मेंहदी, हाथी मेरे साथी, अंदाज या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर दो रास्ते, दुश्मन, बावर्ची, मेरे जीवन साथी, जोरू का गुलाम, अनुराग, दाग, नमक हराम, हमशक्ल हे चित्रपटही हीट ठरले.

 

 

1980नंतर राजेश खन्ना यांचा काळ संपत आला. त्यानंतर ते राजकारणात आले. १९९१मध्ये नवी दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. 1994 मध्ये पुन्हा एकदा खुदाई चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर येण्याचा प्रयत्न केला. आ अब लौट चलें, क्या दिल ने कहा, जाना, वफा जैसी या चित्रपटांमध्ये अभिनय केला परंतु त्यांना फारसे यश आले नाही.

Tags: