तामिळनाडूत बंदी घालण्यात आलेला वादग्रस्त सिनेमा डॅम 999 आणि त्यातील तीन गाणी 84 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाच्या शर्यतीत उतरले आहेत. डॅम 999 ची निवड सर्वश्रेष्ठ फिल्मच्या विभागातील २६५ फिल्ममध्ये करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त यातील तीन गाण्यांचा समावेश मुळ गीतांच्या विभागातील नामांकनासाठी निवडण्यात आलेल्या ३९ गाण्यांमध्ये करण्यात आला आहे. ऍकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेस आपल्या संकेतस्थळआवर या यादीची घोषणा केली आहे. डॅम 999 मधली तीन गाणी गीत ‘डक्कानागा डुगु’, ‘डैम 999 थीम सांग’ आणि ‘मुझे छोड़ के’ अंतिम नामांकनांच्या श्रेणीत निवडण्यात आली आहेत.
सिनेमाचे दिग्दर्शक सोहन रॉय जे मरीन इंजिनियर आहेत ते या बातमीने बेहद खुष झाले आहेत. रॉय यांनी एक निवेदना द्वारे डॅम 999 ने मोठी कामगिरी करुन दाखवली आहे. तसंच माझ्या ड्रीम प्रोजेक्टला यामुळे ओळख मिळाल्याचं ते म्हणाले. डॅम 999 तमिळनाडू सोडून देशातील बाकी भागात रिलीज झाले. तमिळनाडू आणि केरळातील मुल्लापेरियार धरणाच्या संदर्भात वाद भडकला आहे आणि त्याचेच चित्रण यात केलं आहे तसंच रॉय हे केरळचे असून त्यामुळे तमिळनाडूत या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. मुल्लापेरियार धरण ११५ वर्षापूर्वी बांधण्यात आलं आणि त्याला तडे गेले आहेत.