Zee 24 Taas Udyog Sammelan: झी 24 तासच्या उद्योग संमेलनात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार मंगलप्रभात लोढा,मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. या मान्यवरांच्याहस्ते विविध उद्योजकांना पुरस्कृत करण्यात आले.
महाराष्ट्रात रोजगार येत आहे. अनेक मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना माणसांची गरज असते. पण महाराष्ट्रातील लोकांना किती नोकऱ्या मिळतात? हे महत्वाचे आहे. कामगारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. महाराष्ट्र ही आपली भूमी आहे. त्यामुळे इथले व्यवसाय सुजलाम सुफलामा करायचे असल्याचे, महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. मुंबईच्याजवळ 100 एकर जमिन इनोव्हेशनसाठी घेतली आहे. वर्ल्ड बॅंकने यासाठी 250 कोटी दिले आहेत. या बजेटमध्ये मोठी तरतूद यासाठी होईल. सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत पण ते राज्याबाहेर जातात. यासाठी स्टार्टअप नेक्स्ट डोअर संकल्पना सुरु करणार आहेत. यामुळे आपल्या स्टार्टअपची संख्या 1 लाखांच्यावर जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना आपण सुरु केली. यातील जास्त लोकांनी सरकारी योजनेत नोकरी मिळाल्या. आम्ही प्रत्येक एमआयडीसीत रोजगार मेळा करतोय. आपल्याकडील आयटीआयमध्ये उद्योगपतींचा सहभाग वाढवणार आहोत. महाराष्ट्रातील तरुण-तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. वर्ष संपेपर्यंत 5 लाख जणांना रोजगार देणार असल्याचे लोढा यावेळी म्हणाले.
दावोसला आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत करार केले. यातून बेरोजगारी दूर होणार आहे. दावोसलाच का जाता? असा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी सर्व कंपन्यांचे मालक, अनेक पंतप्रधान, मुख्यमंत्री असतात. कोणता देश उद्योजकांना आकर्षित करु शकतो? हे कळते. आम्ही पारदर्शकपणाने दावोसला गेलो आणि विक्रमी गुंतवणूक आणण्यास यशस्वी ठरलो. यामुळे 15 लाख रोजगार तयार होणार आहेत.
आम्ही उद्योजकांना जागा देतो की नाही ते पहा. इन्सेंटीव्ह देतो की नाही हे पाहा. चांगली चर्चा करा. पण टीका करायची म्हणून करु नका, असे उदय सामंत विरोधकांना उद्देशून म्हणाले. झालेल्या एमओयूची अंमलबजावणी होते की नाही, हे माध्यमांनीदेखील पाहावं, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मत्स्य आणि बंदारे मंत्री नितेश राणे यांनीदेखील विविध विषयांवर भाष्य केले. जे खातं मला दिलंय त्यामाध्यमातून कोकणात चांगला विकास करण्याची संधी मला मिळाली आहे. खूप वर्षानंतर दोन्ही खाती एकाच मंत्र्याला मिळाली आहेत. मासा हातात न घेणाऱ्या, न खालेल्या मंत्र्यांना आतापर्यंत हे पद मिळालंय. पण आम्हाला किनारपट्टीचा चांगला अभ्यास आहे. आपलं राज्य इतरांच्या तुलनेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
मत्स्य शेतीतून रोजगार कसा निर्माण होईल यासाठी काम सुरु आहे. तारापोवा मत्सालयावर काम सुरु आहे. पुण्यासारख्या भागात एक्वारियम उभे करु शकतो का? यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणयासाठी यंत्रणेत शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काहींना सुतासारखे सरळ केले की बाकीचे सर्वजण चांगले काम करतील, असेही ते म्हणाले. वाढवण विकास बंदर प्रकल्प पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 10-12 बैठका यावर झाल्यायत. यातील सगळ चोख नियोजन झालंय. राज्य, केंद्रीय खाते आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू. हे बंदर देशाच्या दृष्टीकोनातून गेमचेंजर ठरणार असल्याचे ते म्हणाले. शिप ब्रेकींग हे गुजरात, कर्नाटकमध्ये होतं पण आपल्या राज्यात होत नाही.