मुंबई : अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय.
पीडित महिलेच्या मागे राज्य महिला आयोग उभा राहणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिलीय. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
अंजली दमानिया यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवला गेला असून पडताळणीसाठी पोलिसांना वेळ घ्यायला हवा असंही विजया रहाटकर म्हणाल्या.