Viral video: मुंबईमध्ये नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. रात्री 12 वाजताच नवीन वर्षाच्या जयघोषाने संपूर्ण मुंबई दुमदुमली. तर काही ठिकाणी फटाके फोडून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या नवीन वर्षाच्या स्वागताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, अशातच सध्या भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ सध्या जास्तच चर्चेत आला आहे.
दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय रेल्वेने अतिश अनोख्या आणि खास पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
भारतीय रेल्वेकडून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत
भारतीय रेल्वेचा नवीन वर्षाचे स्वागत करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यामध्ये घड्याळात रात्रीचे 12 वाजलेले दिसत आहेत. त्याच वेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या सर्व लोकल ट्रेनमधील चालकांनी एकाच वेळी हॉर्न वाजवू लागले. हे दृश्य पाहून प्रवाशांना प्रथम धक्का बसला. पण काही वेळानंतर त्यांना समजले की, नवीन वर्ष साजरे करण्याची ही भारतीय रेल्वेची खास पद्धत आहे.
यावेळी तिथे असणाऱ्या प्रवाशांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून लोकांनी या अनोख्या पद्धतीने केलेल्या स्वागताचे कौतुक देखील केले आहे. तर कमेंट्स करून लोकांनी भारतीय रेल्वेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
"Pure Goosebumps" Indian Railways Welcoming 2025 in Style pic.twitter.com/SmvfkeOvXi
— Trains of India (@trainwalebhaiya) December 31, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अनेक लोक दिसत आहे. त्यांनी देखील यावेळी नवीन वर्षाचे स्वागत केले. तर काही चाहत्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये काही चाहत्यांनी म्हटले आहे की, असे छोटे क्षण आयुष्य खूप सुंदर बनवतात. तर दुसऱ्याने म्हटले की, भारतीय रेल्वेचा विलक्षण उत्सव. मुंबईतील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
काही जणांनी 31 डिसेंबरच्या दिवशी या वर्षातील शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचप्रमाणे रात्री 12 वाजता देखील मरीन ड्राइव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती.