मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या 'दि म्युनिसिपल युनियन'ची स्थापना

मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 'दि म्युनिसिपल युनियन'ची स्थापना करण्यात आली आहे.

Updated: Dec 11, 2017, 08:22 PM IST
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या 'दि म्युनिसिपल युनियन'ची स्थापना  title=

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 'दि म्युनिसिपल युनियन'ची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईतल्या परळच्या शिरोडकर सभागृहामध्ये पार पडलेल्या मेळाव्यात या युनियनची स्थापना आणि नोंदणी करण्यात आली.

या मेळाव्याला भाजप आमदार आशिष शेलार, कामगार नेते विश्वास उटगी, दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या पत्नी शांता राव यांच्याबरोबरच अनेक कामगार नेते आणि दिग्गज उपस्थित होते. महापालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रश्नावर युनियनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x