मुंबई : सायन रूग्णालयातील कँन्सर, ह्रदयरोग रूग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दरवर्षी आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात येते. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनाही इतरांप्रमाणे दिवाळी साजरी करता यावी, यासाठी दरवर्षी दिवाळीपूर्वी श्रद्धा चँरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने या रूग्णांना भेटवस्तू दिल्या जातात. यंदा ८ व्या वर्षीही दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारे रेशन, मिठाई, कपडे अशा ३२ प्रकारच्या वस्तू सुमारे १ हजार गरीब रूग्णांना देण्यात आल्या.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते या भेटवस्तू रुग्णांना देण्यात आल्या. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, आरोग्य समिती अध्यक्षा अर्चना भालेरावही उपस्थित होत्या.
रूग्णांच्या मनोरंजनासाठी सांगितिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
श्रध्दा फाऊंडेशनच्या वतीनं वर्षभर गरजू आणि गरीब रूग्णांसाठी आर्थिक, औषधे आणि वस्तूरूपाने मदत केली जाते. विशेष म्हणजे श्रद्धा फाऊंडेशनमध्ये काम करणा-या सर्व महिला आहेत.