मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपल्या मुजोर कार्यकर्त्याविरोधात अखेर कारवाईचा बडगा उगारलाय गेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विनोद अरगिले नामक पदाधिकाऱ्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. मनोज याने एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. यानंतर सर्वच स्तरावरूल याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या, मोठ्या प्रमाणात टीकाही होत होती. यानंतर मनोजवर मनसेने कारवाई करत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे.
मुंबईच्या मुंबादेवीमध्ये एका महिलेला मारहाण केल्याची बातमी zee 24 taas ने दाखवली होती. हा वाद गणेश मंडपावरी असल्याचं समोर आलेलं. यानंतर या पदाधिकाऱ्याने महिलेला थेट कानाखाली मारली. या भांडणात विनोद अरगिले याने महिलेला धक्काबुक्की केल्याचं स्पष्ट पाहायला मिळतं आहे. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ zee 24 taas ने सर्वात आधी दाखवला होता.
मनसेने या घटनेचा जाहीर निषेध करत या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. राज ठाकरे यांच्याकडून कायम महिलांचा आदर केला जातो. तशा सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही दिल्या गेलेल्या आहेत. सदर घटनेने मन विषण्ण झालं म्हणत पक्षातर्फे परिपत्रक काढत बाळा नांदगावकर यांनी कारवाई केल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबत पुढील चौकशीही केली जाईल असंही नांदगावकर म्हणाले आहेत.
MNS kicked arrogant party worker after viral video of vinod beating women in mumbai