मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री १ ते रविवार, पहाटे ६ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडपर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे काही उपगनगरीय गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस माटुंगा ते मुलुंडमध्ये धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्गावर मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ६.२१ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर सीएसएमटी-कुर्ला आणि कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवरसुद्धा मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकापर्यंत दोन्ही मार्गांवर रा. १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.
या ब्लॉकमुळे रात्री उशीरा प्रवास करताना प्रवाशांची काही प्रमाणात अडचण होणार आहे. दरम्यान या ब्लॉकनंतर रविवारी नेहमीच्या वेळेत कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही.