मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या २-३ दिवसांपासून तब्येत ठिक नसल्याने त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या. आज त्रास वाढल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.