आज राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १०,५७६ रुग्ण वाढले

राज्यात आज ५,५५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Updated: Jul 22, 2020, 08:49 PM IST
आज राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १०,५७६ रुग्ण वाढले title=

मुंबई : आज राज्यात कोरोनाचे तब्बल १०,५७६ रुग्ण वाढले आहेत. राज्यात आज ५,५५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १,८७,७६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२% एवढे झाले आहे. 

राज्यात आज २८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के इतकं आहे. आतापर्यंत झालेल्या १६,८७,२१३ चाचण्यांपैकी ३,३७,६०७ (२० टक्के) चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५८,१२१ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर ४४,९७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज एकूण १,३६,९८० अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

रायगड : आज दिवसभरात तब्बल 439 नवीन रूग्ण वाढले.
ठाणे : आज महापालिका क्षेत्रात 327 कोरोना रुग्ण वाढले.
वसई-विरार : आज दिवसभरात १३७ कोरोना रुग्ण वाढले.
कल्याण डोंबिवली : आज 421 कोरोना रुग्ण वाढले.
नवी मुंबई : आज एकूण 303 कोरोना रुग्ण वाढले.
निफाड : तालुक्याती आज 23 कोरोना रुग्ण वाढले.
उल्हासनगर:151, बदलापूर: 70, अंबरनाथ: 69 रुग्ण वाढले.
अमरावती : जिल्ह्यात आज कोरोनाचे 12 नवे रुग्ण वाढले.