मुंबईतील मेगाब्लॉकबाबत महत्त्वाची बातमी; रविवारी कोणत्या मार्गावरुन कराल प्रवास, जाणून घ्या

Mumbai Sunday Megablog News : गणेशोत्सवामुळे उद्या रविवारी तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

Updated: Sep 3, 2022, 07:53 AM IST
मुंबईतील मेगाब्लॉकबाबत महत्त्वाची बातमी; रविवारी कोणत्या मार्गावरुन कराल प्रवास, जाणून घ्या title=

 मुंबई : Mumbai Sunday Megablog News : गणेशोत्सवामुळे उद्या रविवारी तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबणार आहे. या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मात्र, त्याचवेळी मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार नाही.

मध्य रेलवर मेगाब्लॉग नाही

मध्य रेल्वेच्या हार्बर आणि मध्य मार्गावर गणपती उत्सवामुळे मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. मात्र, पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक असणार आहे. रविवार 4 सप्टेंबर 2022 रोजी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान हा ब्लॉक असणार आहे. (Jumbo Block between Santacruz and Goregaon stations) या ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10.00 ते 15.00 वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर तांत्रिक काम करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर  पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. दरम्यान, धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील आणि अप धीम्या मार्गावरील सर्व उपनगरी गाड्या अप जलद मार्गांवर चालवल्या जातील. सर्व धीम्या उपनगरीय गाड्यांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल तर जलद मार्गावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे कोणत्याही दिशेच्या उपनगरीय गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.