10 हजार कोटींची डर्टी फिल्म्स इंडस्ट्री कशी चालते? वाचा

12 वर्षांपूर्वी सुमारे 70,000 अश्लि-ल वेबसाईट होत्या. आजच्या घडीला त्याची संख्या 4.2 मिलियनपेक्षाही जास्त आहे

Updated: Jul 20, 2021, 04:47 PM IST
10 हजार कोटींची डर्टी फिल्म्स इंडस्ट्री कशी चालते? वाचा title=
संग्रहित फोटो

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्ली-ल चित्रपटांची निर्मिती आणि प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्ली-ल चित्रपटांची निर्मिती प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आलं आणि चौकशीसाठी राज कुंद्राला बोलवण्यात आलं. त्यानंतर अश्ली-ल चित्रपटांची निर्मिती करणं आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली

राज कुंद्रा याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा डर्टी इंडस्ट्रीचं भयावह सत्य जगासमोर आलं आहे. अनेक मोठ्या कंपन्या यात पैसे गुंतवून करोडो रुपयांची कमाई करत आहेत. मात्र ही इंडस्ट्री चालते कशी.... एक विशेष रिपोर्ट 

10 हजार कोटींची डर्टी फिल्म इंडस्ट्री

बंद खोलीत बघितला जाणारा अश्लि-ल चित्रपटाचा हा व्यवसाय किती करोडचा हे ऐकून तुम्हाल धक्का बसेल. फोर्ब्स या मासिकाने दिलेल्या एका रिपोर्ट नुसार जगभरात अश्लि-ल चित्रपटांचा हा व्यवसाय तब्बल 10 ते 14 हजार कोटी रुपयांचा आहे. इंटरनेटवर सर्वाधिक चालणारा आणि सर्वाधिक कमाई करणारा हा व्यवसाय आहे. यातला सर्वाधिक म्हणजे 10 टक्के व्यवसाय हा अमेरिकेतून होतो. 

भारतात लपून-छपून केला जातो व्यवसाय

जगभरातील एकूण अश्लि-ल साईट्स पाहणाऱ्यापैकी भारत, पाकिस्तान आदी देशातील लोकं अधिक अश्लि-ल साईट्स पाहतात असं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. भारतामध्ये अश्लि-ल चित्रपट बनविण्यास कायद्याने बंदी आहे. पण भारतात अश्लि-ल चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या इतकी आहे की अमेरिका आणि इंग्लंडनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कायद्याने बंदी असली तरी लपून-छपून काही जण या व्यवसायत गुंतले आहेत. वापरकर्ते मोठ्या प्रमाणावर काय सर्च करतात यावरुन अश्लिल चित्रपटांची मागणी पूर्ण केली जाते. 

2018 मधल्या एका रिपोर्टनुसार जगात अश्लि-ल वेबसाईटवर एक युजर साधारण 10 मिनिटं 13 सेकंदापर्यंत थांबतो. भारतात हा अॅव्हरेज 8 मिनिटं 23 सेकंद इतका आहे. भारतात 2020 च्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक 95 टक्के अश्लि-ल कंटेट बघितला गेला. यावर निर्बंध घालत भारतीय टेलिकॉम ऑपरेटर्सने अश्लि-ल वेबसाईटवर बंदी आणली. पण बंदीनंतरही या साईट्स नामसादर्भ असलेल्या डोमेन्स तयार करुन बघितल्या गेल्या.

डर्टी इंडस्ट्रीबाबतची सत्यत्या

- जगातील सर्वात मोठी डर्टि इंडस्ट्री कॅनडामध्ये आहे.

- 12 वर्षांपूर्वी सुमारे 70,000 अश्लि-ल वेबसाईट होत्या. आजच्या घडीला त्याची संख्या 4.2 मिलियन इतकी झाली आहे.

-  खुपच कमी वेबसाईट आहेत, ज्या खऱ्या (ओरिजनल) फिल्म बनवतात. बहुतांश अनेक वेबसाईट या त्यांचा कंटेट दुसऱ्यांकडून विकत घेतात.

- चोवीस तासांपैकी कोणतीही वेळ घेतली असता कमीत कमी, 30,000,00 इतके लोक जगभरात अश्लि-ल वेबसाईट पाहात असतात. 

- डर्टि इंडस्ट्री अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग, नॅशनल बास्केटबॉल असोशिएशन, मेजर लीग बेसबॉल अनेक मोठे टीव्ही नेटवर्क्स किंवा हॉलिवूड, बॉलिवूडपेक्षा जास्त पैसे कमावतात. 

- अमेरिकेत प्रत्येक 39 मिनीटांना एक पॉर्न फिल्म बनते.

87 अश्लिल व्हिडिओ आणि 36 लाखांची कमाई

अश्लिल चित्रपट बनवणं आणि ते वेबसाईटवर प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली 6 फेब्रुवारीला मुंबई गुन्हे शाखेनं गहना वशिष्ठ या अभिनेत्रीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गहनाने 87 अश्लिल व्हिडिओ तयार केले आणि आपल्या वेबसाईटवर अपलोड केले. हे व्हिडिओ पाहण्यासाठी 2000 रुपयांचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागत होतं. गहनाच्या तीन बँक खात्यातून एकूण 36 लाख रुपये जप्त करण्यात आले. 

स्ट्रगलिंग कलाकारांना जाळ्यात ओढलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गहन वशिष्ठ स्ट्रगलिंक कलाकारांना काम आणि पैशांचं आमिष दाखवून त्यांचे अश्लिल व्हिडिओ तयार करत होती. याबदल्यात या कलाकारांना 15 ते 20 हजार रुपये मोबदला दिला जात होता. गहना वशिष्ठच्या अटकेनंतर उमेश कामत या आणखी एका व्यक्तिला अटक करण्यात आली. उमेश कामत याचं काम व्हिडिओ परदेशातील सर्वरमध्ये अपलोड करणं हे होतं. याबदल्यात त्यांना एका व्हिडिओमागे दोन ते अडीच लाख रुपये मिळत होते.