तन्मय टिल्लू, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेला (Shivsena) जबरदस्त धक्का देत निवडणूक आयोगानं (Election Commission of india) 3 नोव्हेंबरला होणारी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुक (Andheri By Election 2022) चुरशीची केलीये. एकीकडे दसरा मेळाव्यानंतर रस्त्यावरची ताकद दाखविण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट कामाला लागले खरे पण निवडणूक आयोगानं सर्जिकल स्ट्राईक करत मोठा पेच निर्माण केला आहे. पण या सगळ्यात भाजपला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीये. (has bjp may be benefited from feud between uddhav thackeray and eknath shinde group)
धनुष्यबाण चिन्हाबाबतचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद तात्पुरता संपुष्टात आला आहे. निवडणूक आयोगानं याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ (Bow Arrow) चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात असला तरी ही लढाई आता खऱ्या अर्थाने सुरु झालीये. नव चिन्हं, नवा प्रचार आणि नवी रणनिती आखून येणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेला उतरावं लागेल. नव्या चिन्हाबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत घेण्याचे आदेशही निवडणूक आयोगानं दिलेत. त्यामुळे जेमतेम 2 दिवसात नवं चिन्ह निवडून पुढील निवडणुकीला सामोरं जाण्याच आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला वेगळे चिन्ह देण्यात येईल, असेही निवडणूक आयोगायाने म्हटलं आहे.
शिंदे गटाकडून या निवडणुकीत जोरदार ताकद लावण्याबाबत चर्चा झाली असली तरी ही जागा भाजप लढवणार आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच रणनीती ठरविली जाणार असल्याचं समजते. भाजपचे निवडणूक चिन्ह हे कमळ असल्याने त्याचा प्रचार करायची वेळ शिंदे गटावर येणार आहे. त्यामुळे या दोघांच्या भांडणात भाजपचा लाभ होईल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.