नवी दिल्ली : नव्या वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामनान्य नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आज GST परिषदेची 46 वी बैठक होत आहे. ही बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
GST मध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के असे स्लॅब आहेत. ज्या वस्तूंवर सध्या 5 टक्क्के GST आहे त्यापैकी काही वस्तू ह्या 12 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये टाकण्यात येणार होत्या. मात्र यासंदर्भात आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
फुटवेअर आणि कापडाचे दर वाढवण्यावर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कपडे आणि चपलांवर जे दर आहेत तेच सुरू राहणार आहेत वाढलेले दर तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कापडावरील जीएसटी 5% वरून 12% करण्याला अनेक राज्यांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावावर पुन्हा विचार करून परिषद नवीन प्रस्ताव आणणार आहे. काही वस्तूंवर लागू होणारे GST दर नव्याने लावले जाऊ शकतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लक्झरी वस्तूंवरचा दर आणखी वाढणार का याकडे देखील लक्षं लागलं आहे. फुटवेअर आणि कपड्याचे दर वाढवण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.