मुंबई : बेस्ट कर्मचारी संघटना आणि बेस्ट समिती यांच्या बैठकीत समाधान कारक निर्णय न झाल्यामुळे सर्व कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे. आज मध्यरात्री पासून बेस्ट कर्माचारी संपावर जाणार आहे. बेस्ट समितीच्या बैठकी नंतर मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या सोबत बैठकीसाठी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी जाणार आहेत.
‘बेस्ट खासगीकरणाच्या वाटेवर आहे. त्यामुळे कर्मचारी कपात होणार आहे. त्यामुळे आम्ही संप करणारच. बेस्टचे ३२ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार, असे बेस्ट कर्माचारी संघटनेचे शशांक राव म्हणाले.
तर युनियनच्या पदाधिकऱ्यांना महा-व्यवस्थापकांनी आश्वासन दिलं आहे की खाजगीकरण होणार नाही. कामगारांची कपात होणार नाही. शिवसेना या संपात सहभागी होणार नाही. सर्व बेस्ट कामगारांना आवाहन संपात सहभागी होऊ नये, असे बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ म्हणाले.
सध्या बेस्ट ८८० कोटींच्या तोट्यात आहे. ज्या कारणामुळे कामगांर संघटना संपावर जातायेत त्या कामगार कपातीची भीती कामगार समघटनांनी बाळगू नये. कामगारांची कपात होणार नाही. शिवसेना या संपात सहभागी होणार नाही. सर्व बेस्ट कामगारांना आवाहन संपात सहभागी होऊ नये. बेस्ट सध्या ४५० बसगाड्या भाडेतत्वावर घेतेय. या उपक्रमानं प्रति किमी ५० रुपये तुट कमी होणार आहे. जर भाडेतत्वावरच्या बसेसचा प्रयोग फेल ठरला तर बेस्टला होणारं नुकसान महापालिका भरुन देईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलंय, असे बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितलंय.