ठाणे : ठाण्यातील आरटीओ ऑफिस रोड परिसरात भरदिवसा एका तरुणीवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आलंय. याप्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केलीयं. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोयं. आरोपी विरोधात याआधी तक्रार केली असूनही कोणतीही कारवाई केली नसल्याचे वास्तवही समोर आलंय. आकाश पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राची झाडे ही तरुणी ठाण्याच्या जोशी-बेडकर महाविद्यालयात वाणिज्य विभागतील दुसऱ्या वर्षात शिकत होती. चाकूने सपासप वार केल्यानंतर हल्लेखोर आकाश घटनास्थळावरुन फरार झाला. उपचारादरम्यान या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असुन पोलिसांनी आकाश पवार नावाच्या आरोपीला भिवंडीतून ताब्यात घेतले आहे
याआधी मुलीने ११ जून रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात याच मुलाबद्दल पोलीस तक्रार दिली होती ..तू दुसऱ्या मुलासोबत बोलू नकोस अशी धमकी आकाशने प्राचीला दिली होती. दरम्यान पोलीस पुढचा तपास करत आहेत . यानंतर लोकांनी तरुणीला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.