नाशिक : जिल्ह्यात लासलगावमधील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये असलेल्या आशीर्वाद मेडिकलमध्ये चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेची घरफोडी करून पोबारा केला. सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाल्यानं याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दोन पथकं तयार करून चोरीचा तपास लासलगाव पोलीस करत आहे.
या चोरीच्या घटनेदरम्यान डॉक्टर निकम यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसुती विभागाच्या गेट जवळ झोपलेल्या कांताबाई कुरे या महिलेला आवाज केल्यास तुला जिवे ठार मारू अशी ही धमकी या चोरट्यांनी दिली होती. सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाल्यानं या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी दोन पथकं तयार करून या चोरांचा शोध सुरू केलाय.