नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया! मुंबई पुण्याच्या हायफाय लाईफस्टाईलला देतात टक्कर

नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते? जाणून घेऊया या एरियाची खासियत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 26, 2025, 11:56 PM IST
 नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया! मुंबई पुण्याच्या हायफाय लाईफस्टाईलला देतात टक्कर title=

Rich area in Nagpur : मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. तर, पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मुंबई हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत स्थळ आहे. तर, महाराष्ट्रातील श्रीमंत शहरांच्या यादीत पुणे हे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई आणि पुणे या शहराना टक्कर देत आहे ते महाराष्ट्रातील नागपूर हे शहर. जाणून घेऊया नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते. नागपूरमधील या भागांमध्ये मुंबई पुण्यासाठी हायफाय लाईफस्टाईल पहायला मिळते. 

हे देखील वाचा...  पुण्यातील सर्वात श्रीमंत एरिया, इंथ राहतात करोडपती; मुंबईसारखी हायप्रोफाईल लाईफस्टाईल

विदर्भातील नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून देखील ओळखले जाते. नागपूर हे महाराष्ट्रातील झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. नागपूर ही महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगीक वसाहत देखील आहे. नागपूर हे शहर मेट्रो सिटी म्हणून देखील आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. दिवसेंदिवस नागपूर शहरात घरांच्या किंमती देखील वाढत आहेत. 

जाणून घेऊया नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते?

  • मानेवाडा हा नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया आहे. येथे अनेक मोठे गृहप्रकल्प आहे. 
  • कोराडी रोड देखील नागपूरमधील श्रीमंत एरिया आहे.  कोराडी थर्मल पॉवर प्लांटला जोडणारा हा  पॉश एरिया आहे. येथे आलिशान सोसायट्या आहेत. यात बंगले, बहुमजली अपार्टमेंट आणि रो हाऊस आहेत. 
  • वर्धा रोड हा नागपूरमधील सर्वात हायप्रोफाईल एरिया आहे. अनेक श्रीमंत व्यक्तींची येथे घरं आहेत. 
  • नरेंद्र नगर हा नागपुरातील सर्वात जलद-विकसनशील होत असलेला एरिया आहे. उत्तर पायाभूत सुविधा असलेला हा परिसर सार्वजनिक वाहतूक सुविधांद्वारे शहराच्या इतर भागांशी उत्तम प्रकारे जोडलेला आहे. 
  • त्रिमूर्ती नगर हा नागपूरमधील सर्वात शांत परिसर आहे, शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या या परिसरात अनेक श्रीमंत लोक राहतात. 
  • शंकर नगर परिसरात अनेक उंच उमारती आहेत. तसे येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. यामुळेच हा परिसर नागपूरमधील हायप्रोफाईल परिसर म्हणून ओळखला जातो. 
  • सिव्हिल लाईन्स नागपुरातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित एरिया आहे. शहरातील उच्चभ्रू  नागरिक याच एरियात राहतात. 
  • धरमपेठ, रामदासपेठ  आणि शिवाजी नगर हे देखील नागपूरमधील श्रीमंत एरिया म्हणून ओळखले जातात.