Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांवर मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? या सर्व प्रश्नांबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर खुलासा केला आहे.
ईव्हीएम मतमोजणीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. डाटा एन्ट्री आणि कॉऊंटिग हे दोन वेगळे प्रकार आहेत. अस स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. ओटीपीमुळे ईव्हीएम हॅक होत नाही, असा खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे. ईव्हीएम हॅक करणं शक्यच नाही, असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटंल आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकरांनी केला आहे. या प्रकरणात गोरेगाव पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे विजयी खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई असते. मात्र, मतमोजणीदरम्यान रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे मोबाईल घेऊन आले होते.
निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांनी त्यांना मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली. मंगेश पंडिलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन गोरेगावच्या वनराई पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस समन्सही बजावणार आहेत.
दरम्यान काँग्रेस पक्षानंही ट्विटरवरुन EVMबाबत काही सवाल उपस्थीत केलेत... मुंबईतील रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा फोन EVMशी जोडला होता.. यावरुन काँग्रेसनं निवडणूक आयोगाला काही सवाल विचारलेत.
EVMबाबत आरोप हा त्यांचा रडीचा डाव - रविंद्र वायकरांचा पलटवार
EVMबाबत आरोप हा त्यांचा रडीचा डाव असल्याचा पलटवार रविंद्र वायकरांनी केला आहे. त्याचबरोबर लोकशाही आहे ते कोर्टात जावू शकतात. असा सल्लाही वायकरांनी आदित्य ठाकरेंना दिला. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप ठाकरे पक्षाने केलाय. मात्र त्याचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिलाय. आता याप्रकरणी ठाकरे पक्ष कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. तसंच एकदा जो गद्दारी करतो तो कायम गद्दार असतो अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी केलीय. तर पराभव जिव्हारी लागल्याने ईव्हीएमचे आरोप ठाकरे गट करतोय. हा त्यांचा रडीचा डाव असल्याचा पलटवार रवींद्र वायकरांनी केलाय..EVM वरून भास्कर जाधवांनी भाजपवर निशाणा साधलाय...EVM हॅक करणं हा भाजपचा हातखंडा आहे...भाजपचे सहयोगी हे शिंदे आहेत आणि शिंदेंचे उमेदवार हे वायकर आहेत...त्यामुळे ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाहीतर वाण लागणारच अशी खोचक टीका भास्कर जाधवांनी केलीय...