अमर काणे / नागपूर : येथील वन्यजीव छायाचित्रकार सरोष लोधी (Wildlife photographer Sarosh Lodhi) मसाई मारा येथे दोन झेब्रांचा एकत्र काढलेला अफलातून फोटो सध्या संपूर्ण जगात चर्चेत विषय झाला आहे. या दोन झेब्रांपैकी नेमका डाव्या की उजव्या बाजूच्या झेब्रा समोर पाहतोय याबाबत प्रचंड उत्सुक्ता सर्वांमध्ये निर्माण होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
'वाईल्ड लाईफ' फोटोग्राफर सरोश लोधी यांनी डिसेंबर २०१८मध्ये मसाई मारा येथे दोन झेब्रांचा हा फोटो काढला होता. हा फोटो त्यांचे मित्र भारतीय वन अधिकारी (आयएफएस) परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.त्यांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर संपूर्ण जगात चर्चेत आला. लोधी यांनी काढलेला या दोन झेब्रा यांच्या फोटामधील डाव्या की उजव्या बाजूच्या झेब्राचा चेहरा आहे. याबाबत भ्रम निर्माण होत आहे.
Let’s see who can tell which Zebra is in front. Clicked & asked by friend @saroshlodhi. pic.twitter.com/RNAMBJrk1K
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 8, 2020
या अफलातून फोटोवरून लोधी यांनाही जगाच्या कानाकोपऱ्यातून दोन झेब्रा यांच्यापैकी कोणता झेब्राचा चेहरा समोर पाहत आहे असे विचारणा करणारे फोन आणि मेल येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत बरीच चर्चा सुरु आहे.
"Whose face is that?" @mrdanwalker and @sallynugent are looking for the answer on #BBCBreakfast
Credit: Sarosh Lodhi pic.twitter.com/U6hhKkb3UO— BBC Breakfast (@BBCBreakfast) July 13, 2020
Photographer Takes A Photo Of 2 Zebras In Kenya, And People Can’t Agree On Which One Is Looking At The Camera.https://t.co/iDSo9JthNb
— Charles Onyango-Obbo (@cobbo3) July 10, 2020