बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सातारा शहरातल्या कोटेश्‍वर मंदिर परिसरात दोन हजाराच्या आणि पाचशे रूपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय.

Updated: Jun 14, 2018, 03:38 PM IST
बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश  title=

सातारा : सातारा शहरातल्या कोटेश्‍वर मंदिर परिसरात दोन हजाराच्या आणि पाचशे रूपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय.

अनिकेत यादव, अमोल शिंदे या दोघांकडून 56 लाख 42 हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्यायत. हे दोघे बाजारात खोट्या नोटा देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.

किती रोकड जप्त? 

 26 लाख 54 हाजर पाचशे रुपयाच्या बनावट नोटा छापलेल्या तर 29 लाख 88 हजार रुपयाच्या अर्धवट छापलेल्या नोटा अशा एकूण 56 लाख 42 हजार पाचशे रुपयांच्या नोटा मिळाल्या आहेत... या प्रकरणी एकूण सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. हे सगळे शुक्रवार पेठेतल्या गणेश आर्पाटमेंटमध्ये नोटा छापायचे.