Mumbai-Goa Highway Accident: साळास्ते येथील अपघात मुंबईचे दोघे ठार, दोन जण जखमी

 Mumbai-Goa highway Acciden : मुंबई -गोवा महामार्गावर काल सायंकाळी झालेल्या कार अपघातात मुंबई परेल येथील दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झालेत.  

Updated: May 24, 2022, 08:05 AM IST
Mumbai-Goa Highway Accident: साळास्ते येथील अपघात मुंबईचे दोघे ठार, दोन जण जखमी title=

मुंबई : Mumbai-Goa highway Acciden : मुंबई -गोवा महामार्गावर काल सायंकाळी झालेल्या कार अपघातात मुंबई परेल येथील दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झालेत. हरळलकर हे मुंबईवरुन गोव्याकडे जात होते. यावेळी साळास्ते जिल्हा परिषद शाळेसमोरील दुभाजकावर कार आदळली. या अपघातात कार चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली व्यक्ती असे दोन जण ठार झालेत. तर मागच्या सीटवर बसलेले दोन जण जखमी झालेत.

मुंबईतून गोव्याकडे निघालेली ही कार भरधाव होती. ही कार साळास्ते येथे आली असता रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ही कार कठड्यावर आदळल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या कारलाही ठोकर दिली. या कारचेही नुकसान झाले आहे.

हरमळकर हे मुंबई परेल येथून मुलगीसह गोव्यात जात होते. दरम्यान, त्यांनी रत्नागिरी येथील मित्राकडे आधी गेले. तेथून ते गोवा हरमल येथे जात होते. याच दरम्यान त्याचा मित्र राणे आणि त्याचा भाचाही गाडीतून जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातात मृत झालेल्या दोघे मुंबईचे रहिवासी आहेत. संतोष पांडुरंग हरमळकर ( ४८, प्रभादेवी) आणि सुधीर अर्जून राणे (५६, अंधेरी) अशी त्यांची नावे आहेत. तर आकांक्षा संतोष हरमळकर ( २३) आणि अन्य एक जखमी झालेत. 

संतोष हरमळकर यांचे गाव पेडणे (गोवा) येथे आहे. रत्नागिरीहून सहाच्या सुमारास ते आपली मुलगी आकांक्षा (२३) यांच्यासह सुधीर राणे यांच्यासोबत गोवातील पेडणे येथे जात होते. त्यानंतर ते पेडणे हरमळ येथील देवस्थानला भेट देणार होते. सायंकाळीसहाच्या सुमारास साळीस्ते येथे संतोष हरमळकर यांचा वाहनावरील ताबा सुटला. यात कार दुभाजकाला आदळून अपघातग्रस्त झाली. यात चालक संतोष हरमळकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी सुधीर राणे यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. अपघातात आकांक्षा हरमळकर आणि अन्य एकावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केली. कारमधील जखमींना बाहेरील काढत कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मदत कार्यासाठी सरपंच मैथिली कांबळे, चंद्रकांत हरयान,समीर कुलकर्णी,संजय बारस्कर, प्रभाकर ताम्हणकर, पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, मंगेश कांबळे, वैभव कांबळे, सचिन ताम्हणकर यांनी मदत घेतली. त्यांनी कार अपघात घटनेची माहिती कणकवली पोलिसांना दिली. खारेपाटण पोलीस आणि पोलिस उपनिरीक्षक विनोद कांबळे सह पोलीस,वाहतूक पोलीस घटनास्थळी धाव  घेतली. अधिक तपास करण्यात येत आहे.