मुख्याध्यापिकेच्या सतर्कतेमुळे विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक

शहरात महापालिका शाळेतील १४ विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना

Updated: Feb 28, 2020, 08:52 PM IST
मुख्याध्यापिकेच्या सतर्कतेमुळे विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक title=

नवी मुंबई : शहरात महापालिका शाळेतील १४ विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना मुख्याध्यापिकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सहल होती आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशी शाळेत का बोलवले, असा प्रश्न संबंधित मुख्याध्यापिकेला पडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर संबंधित मुख्याध्यापिकांनी प्रत्येक वर्गावर जावून सांगितलं. 

सुटीच्या दिवशी कुणीही बोलवलं तरी शाळेत येऊ नका, अशा सूचना दिल्यानंतर काही विद्यार्थीनींनी संबंधिक शिक्षक आपल्याशी असभ्य वर्तवणूक करत असल्याचं सांगितलं.

संबंधित शिक्षक हा कम्प्युटर शिक्षक होता, एका सामाजिक संस्थेकडून तो या शाळेत शिकवण्यासाठी येत होता. विद्यार्थींनींशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर १४ विद्यार्थीनींचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे.

अखेर संबंधित संस्था आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर, या शिक्षकाला पोलिसांनी पोक्सो कायद्याखाली अटक केली आहे.