गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टातही दणका

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2018, 09:45 PM IST
गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टातही दणका

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टातही दणका बसलाय. नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिराचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

बांधकाम १५ फेब्रुवारीपर्यंत तोडणार

मंदिराचे अनधिकृत बांधकाम १५ फेब्रुवारीपर्यंत तोडणार असल्याची ग्वाही, मंदिर ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात दिलीय. 

पोलीस बळाची मदत घेऊन तोडण्याचे आदेश

ट्रस्टनं स्वतःहून मंदिराचं बांधकाम तोडलं नाही, तर एमआयडीसीनं पोलीस बळाची मदत घेऊन तोडावं असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.