सुनिल तटकरे थोडक्यात बचावले...

sunil tatkare : पुण्यातील बावधन परिसरात एका खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय.. हे हेलिकॉप्टर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना आणण्यासाठी जाणार होतं... हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे थोडक्यात बचावलेत..

वनिता कांबळे | Updated: Oct 2, 2024, 11:17 PM IST
सुनिल तटकरे थोडक्यात बचावले... title=

Pune Helicopter Crash:  पुण्यात खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय. बावधन परिसरात ही घटना घडली.  दाट धुक्यामुळं हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे. आकाशात उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात हा थरार घडला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर जाणार होतं अशी माहिती मिळतेय 

हेरिटेज एव्हिएशनच्या ऑगस्टा 109 या हेलिकॉप्टरनं बावधनमधील ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलीपॅडवरून टेक ऑफ केलं..  मात्र, अवघं दीड किलोमीटर हवाई अंतर पार करताच हे हेलिकॉप्टर दरीत कोसळलं.. आणि होत्याचं नव्हतं झालं.. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला..

या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे थोडक्यात बचावले असं म्हणावं लागेल.. कारण सुनिल तटकरे यांना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात असताना त्याचवेळी ही दुर्घटना घडलीये.. 
काल परळीतून येताना याच हेलकॉप्टरने मी प्रवास केला. आजही मला घ्यायला हे हेलिकॉप्टर येत होतं.

प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई आणि परमजीत सिंग या तिघांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढलेत.. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.. अपघाताच कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची टीम दिल्लीहून येणार आहे..

दरम्यान 24 ऑगस्टला याच परिसरात हेलिकॉप्टर अपघात घडला होता.  मुंबईहून हैदराबादला निघालेलं व्हेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर मुळशीमध्ये कोसळलं होतं.. या पार्श्वभूमीवर खासगी हेलिकॉप्टर्सच्या अपघातांना गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे.. निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो..अशावेळी अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण अत्यावश्यक आहे..