मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र वनगा कुटुंबीयांची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यास त्यानुसार पुढच्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांनी दिलीय. चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी नुकताच शिवसेनेते प्रवेश केला. त्यामुळे त्यांनाच शिवसेनेकडून तिकीट देण्याविषयीही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला मुंबई आणि ठाण्याचे आमदार, खासदार आणि पालघर जिल्ह्यातील पक्षाचे स्थनिक पदाधिकारी उपस्थित होते.