वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी निवासनी ट्रस्टचा महत्वाचा निर्णय...

महाराष्ट्रातील देवीचे अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तश्रृंगी मंदिराबाबत ट्रस्टने महत्वाचा निर्णय घेतला.

Updated: Apr 1, 2021, 08:08 AM IST
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी निवासनी ट्रस्टचा महत्वाचा निर्णय... title=

नाशिक : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देवीचे अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तश्रृंगी मंदिराबाबत ट्रस्टने महत्वाचा निर्णय घेतला.
 
नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला आहे. नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर भाविकांची नियमीत गर्दी होत असते. गड परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, तसेच भाविकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सप्तश्रृंगी निवासनी ट्रस्टने महत्वाचा निर्यण घेतला आहे.
 
आदीशक्ती सप्तश्रृंगी देवीचे मंदिर १ ते ५ एप्रिल दरम्यान भाविकांसाठी बंद असणार आहे. गड परिसरात  रुग्ण आढळून येत असल्याने जनता कर्फ्य़ू पाळण्यात येणार आहे.
 
सप्तश्रृंगी गड भाविकांसाठी बंद असला तरी, दैनंदिन पंचामृत महापूजा आणि आरती नियमीत सुरू राहणार आहे.