बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण; गुन्हेगारी कृत्यांची कुंडली अंगावर काटा आणणारी

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या गुन्हेगारीची कुंडलीच झी 24 तासच्या हाती लागलीय. यातील गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांची कुंडली पाहिली तर तुमच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

वनिता कांबळे | Updated: Dec 31, 2024, 10:48 PM IST
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण; गुन्हेगारी कृत्यांची कुंडली अंगावर काटा आणणारी   title=

Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्हेगारीची कुंडली झी 24 तासच्या हाती लागली आहे. मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेवर दहा वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत. तर, इतर आरोपींवरही अनेक गुन्हा दाखल आहेत. एवढे गुन्हे असूनही हे आरोपी मोकाट कसे फिरत होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने तर गुन्हांचं दशक पूर्ण केलंय. सुदर्शन घुलेचं वय 26 वर्ष आहे.  मागील दहा वर्षात याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत.  केज पोलिसांमध्ये याच्यावर तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत. मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे दाखल आहेत. 

या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे सुधीर सांगळे हा आहे. सुधीर सांगळेचं वय 22 वर्ष आहे. खुनातील सहभागाचा गुन्हा दाखल आहे. आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणीचा गुन्हा मागीतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 
या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रतीक घुलेवर आठ वर्षात पाच गंभीर गुन्हे दाखल झालेत. प्रतीक घुलेचं वय फक्त 24 वर्ष आहे. 7 वर्षांत केज पोलीस ठाण्यात 5 गुन्हे  दाखल झाले आहेत.  खुनात सहभाग, मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत त्याचा सहभाग आहे.  

संतोष देशमुख हत्या प्रकरणातला चौथा आरोपी विष्णू चाटे हा आहे. विष्णू चाटे राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष आहे. संतोष देशमुख खुनात सहभागाचा गुन्हा आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.  या प्रकरणातील पाचवा आरोपी आहे कृष्णा आंधळे. आंधळेवर चार वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत.  कृष्णा आंधळेचं वय 27 वर्ष आहे. मागील 4 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत.  खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी असे हे गुन्हे आहेत. 

संरपंच देशमुख हत्या प्रकरणातला सहावा आरोपी आहे महेश केदार. केदारवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. महेश केदारचं वय 21 वर्ष आहे. गर्दी मारामारी, चोरी, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, खुनात सहभाग आहे.  बीडमध्ये कशापद्धतीने जंगलराज सुरू आहे याचा हा पुरावा.. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची कुंडली पाहिली तर या आरोपींना कुणाचं अभय आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.. आणि एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना हे आरोपी मोकाट कसे फिरत होते हाही प्रश्न विचार करायला लावणारा आहे..