अमरावती : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीनंतर अखेर आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादावर पडदा पडला. वर्षावर झालेल्या बैठकीनंतर या दोन्ही आमदारांमध्ये दिलजमाई झाली. तसेच राणा यांनी आपले शब्दही मागे घेतले. दरम्यान यानंतर अमरावतीला (Amravati) परतल्यानंतर बच्चू कडू यांनी जाहीर बैठक घेतली. या बैठकीत कडू यांनी राणा यांना थेट इशाराच दिला आहे. (rana vs kadu dispute achalpur mla bacchu kadu warn mla ravi rana at amravati)
"या पुढे वाट्याला गेल्यास पुन्हा माफ करणार नाही. पहिली वेळ आहे माफ करतो", अशा इशारावजा नरमाईचा सूर कडू यांनी आवळला. राणांनी माफी मागितली म्हणून आनंद व्यक्त करतो. राणांनी 2 पावलं मागे घेतली मी 4 पावलं घेतो", असंही कडू यांनी स्पष्ट केलं.
"प्रहार आंडू पांडूचा पक्ष नाही. आम्ही उत्तर द्यायला कमी पडत नाही. कोणाच्या वाट्याला जात नाहीत, गेलं तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही", असंही कडूंनी ठणकावून सांगितलं.
"बच्चू कडू स्वतः 350 गुन्हे घेऊन लढतो. बाकी नेत्यासारख कार्यकर्तेला लढ म्हणत नाही. आजचे हे शक्ती प्रदर्शन नाही. आम्ही सैनिका सारखे जगतो. गर्दीत दर्दी महत्वाचे आहे, सगळे दर्दी असल्यानं बच्चू कडू 4 वेळा निवडणून येतो", असं म्हणत कडूंनी प्रहारचं वेगळेपण नमूद करण्याचा प्रयत्न केला.
कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. तसेच कडू 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, असा गंभीर आरोपही राणांनी केला होता. या आरोपानंतर कडूंनी आक्रमक होत राणांना आव्हान दिलं होतं. "राणा एका बापाचा असेल तर त्याने पुरावा द्यावा. जर केलेला आरोप खरा ठरला तर त्याच्या घरी भांडी घासेन", अशा शब्दात कडूंनी राणांना आव्हान दिलं होतं.