निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : (Pune Accident News) राज्यात काही दिवसांपासून सुरू असणारं अपघाताचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसून आणखी एका भीषण अपघाताचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. पुण्यात रविवारी रात्री एका मद्यधुंद डंपर चालकाने 9 लोकांना चिरडलं, या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू ओढावला.
मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात जखमी असणाऱ्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना रविवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाटा इथं घडली. अपघातावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता असल्याची प्राथमिक माहित पोलिसांनी दिली आहे.
वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ), वैभव रितेश पवार (वय २ वर्ष), रीनेश नितेश पवार (वय ३) वर्ष अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावं असून, इतर सहा जण जखमी आहेत.
पघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, जखमींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखस करण्यात आलं. अपघातात जखमी झालेले सर्वजण कामगार असून रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते. या फूटपाथ वर एकूण 12 जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते. अचानकच भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला आणि पुढील चित्र मन सुन्न करणारं होतं.