अहमदनगर : घरासमोर उभ्या असलेल्या गाड्या जाळण्याचे प्रकार नाशिकनंतर आता कोपरगावमध्येही होण्यास सुरुवात झाली आहे.
कोपरगाव शहरातील सराफ बाजार भागातील पोरवाल बिल्डिंग जवळ राहत असलेल्या संदीप कानकुबजी यांच्या कुटुबीयांच्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिल्यात.
या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले. व्यवसायिक संदीप कानकुबजी यांच्या तक्रारी वरुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.
संदीप कानकूब्जी यांच्या दोन दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिल्याचं उघडकीस, आल्यानं कोपरगाव शहरातील सर्व सामान्य जनतेत दहशत पसरीलीय. दहशत पसरवण्यासाठीच हे कृत्य केलं गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.