सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, भाजपची टीका

 सगळ्या मुद्यांवर आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत असेही फडणवीस म्हणाले. 

Updated: Feb 24, 2020, 12:37 PM IST
सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, भाजपची टीका title=

नागपूर : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना २५ हजार हेक्टरी देऊ असं सांगितलं पण मदत दिली नाही. सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शेतकरी कर्जमाफीची केवळ २० शेतकर्‍यांची यादी जाहीर केली जाणार असून या सगळ्या मुद्यांवर आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत असेही फडणवीस म्हणाले. 

३५ लाख शेतकर्‍यांची यादी तयार असल्याचे सांगून केवळ २० हजार शेतकऱ्यांची सरकार जाहीर करत आहेत. राज्यात ४३ हजार गावांपैकी केवळ ६८ गावातील शेतकऱ्यांची यादी जाहीर करतंय. त्यामुळे शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी भाजपने केली आहे. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी तसेच सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द सरकारने पाळला पाहिजे असे फडणवीस म्हणाले. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधी पक्षाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.