नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NMMC Recruitment 2024:नवी मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून येथे दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करता येणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 23, 2024, 07:51 PM IST
नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NMMC Recruitment 2024: दहावी, बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. नवी मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून येथे दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करता येणार आहे. चांगले पद आणि नोकरी मिळवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. यासाठी कोणती परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

नवी मुंबई पालिकेत वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्सची पदे भरले जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारीच्या 55 जागा, स्टाफ नर्स (स्त्री) च्या 49 जागा आणि
स्टाफ नर्स (पुरुष) च्या 6 जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी पदाची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून तर स्टाफ नर्स पदासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहेत. 

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पदानुसार 17 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रिया रद्द केली जाऊ शकते याची उमेदवारांनी नोंद घ्या. भरतीचे इतर सर्व अधिकार NMMC कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 या पत्त्यावर पाठवायचा आहे. 31 जानेवारी 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. 

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. नियम आणि अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्जामध्ये सध्या कार्यरत असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा