Maharashtra : महाराष्ट्राचा अपमान करण्याचं भाजपचं षडयंत्र - नाना पटोले

Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद (Maharashtra and Karnataka border) थांबायचे नाव घेत नाही. आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय.

Updated: Dec 4, 2022, 12:14 PM IST
Maharashtra : महाराष्ट्राचा अपमान करण्याचं भाजपचं षडयंत्र - नाना पटोले  title=
Nana Patole On Maharashtra and Karnataka border dispute

Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद (Maharashtra and Karnataka border) थांबायचे नाव घेत नाही. काही सांगली जिल्ह्यातील काही गावं कर्नाटकात जाण्याचा इशारा देत आहेत. (Maharashtra  Political News) मात्र, राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. आता तर कर्नाटक सरकारच्या (Karnataka government) मदतीनं महाराष्ट्राचा अपमान करण्याचं षडयंत्र भाजप (Conspiracy of BJP ) रचत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

आम्ही शिवशाहीसोबत आहोत - पटोले

पुणे येथे आयोजित 36 व्या मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त नाना पटोले  पुण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा अपमान करण्याचं षडयंत्र केंद्रातील भाजप रचत आहे, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबंधित जे वादग्रस्त विधान केलं होतं त्यावर  ज्यांना पेशवाईसोबत राहायचं आहे, त्यांनी त्यांच्यासोबत राहावं , ज्यांना शिवशाहीसोबत राहायचं आहे त्यांनी शिवशाहीसोबत राहावं, आम्ही शिवशाहीसोबत आहोत, असं म्हणत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. 

खडसे यांचा राज्य सरकारवर निशाणा 

दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावरुन राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये जाणार नाही म्हणतात. या देशांत एकमेकांच्या राज्यात जाण्यास बंदी आहे का?, असं वक्तव्य करणं देशद्रोह नाही का, असा सवाल खडसे यांनी विचारला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटक राज्यात जाऊ असं म्हटलंय. मग त्यांनी जाऊन दाखवावं असं आवाहनही खडसे यांनी आव्हान दिले आहे.

कर्नाटक पर्यटनाची नागपुरात पोस्टरबाजी  

कर्नाटक पर्यटन विभागाकडून चक्क नागपुरात पोस्टरबाजी करण्यात आलीय. 'चला कर्नाटक नव्याने पाहूया' असं लिहिलेली पोस्टर्स नागपुरात रस्त्यावर लागली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपुरात येत आहेत. नागपूर विमानतळ मार्गावर कर्नाटकमधील पर्यटनस्थळांची माहिती देणारी पोस्टर्स लागली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि पर्यटनमंत्री आनंद सिंह यांचे फोटोही त्यावर लावण्यात आलेत. कर्नाटकाची ही खरोखर पर्यटन स्थळांची प्रसिद्धी मोहीम आहे, की आणखी एक कर्नाटकी नाटक आहे. असा प्रश्न कर्नाटक सरकारच्या या पोस्टरबाजीमुळे निर्माण झालाय.