औरंगाबाद : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली. या वक्तव्यामुळे देशभरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला. तसेच, या वक्तव्याचा मुस्लिम देशांनीही निषेध केला होता.
देशात अनेक ठिकाणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
मात्र, आज औरंगाबाद येथे अचानक हजारो मुस्लिम कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर जमले. नुपूर शर्मा हाय हाय अशा घोषणा या जमावाकडून देण्यात येत होत्या. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा उपस्थित होते.