मोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?

Maharashtra Politics : कोकणातील राजकारण म्हटलं की आपसूकच राणे यांचं नावं तोंडावर येतं.. दिर्घकाळ राजकारणात सक्रीय असलेले नारायण राणे आणि त्यांचं कुटूंब हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत.. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे हे कमळाला बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे.

वनिता कांबळे | Updated: Oct 20, 2024, 11:18 PM IST
मोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?    title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघातून तयारीही सुरू केलीये.. मात्र, महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे.. त्यामुळे निलेश राणेंची मोठी कोंडी झालीये...निलेश राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी राणे पिता पुत्रांनी भाजप नेत्यांकडे आग्रह धरलाय.. मात्र, शिंदेंची शिवसेना या जागेवरील आपला दावा सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे.. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीये.. भेटीदरम्यान निलेश राणेंनी कुडाळ-मालवणमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, या संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांनी दिलीये...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निलेश राणेंना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.. मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल तर निलेश राणेंच्या पाठीमागे महायुती म्हणून खंबीरपणे उभं राहणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक हे सध्या विद्यमान आमदार आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडे प्रभावी उमेदवार नसल्याचे चित्र आहे.. त्यामुळे वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या हालाचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.. त्यामुळे भाजपचे निलेश राणे लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा रंगलेय. 

दरम्यान, निलेश राणे हाती धनुष्य घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. निलेश राणे यांचा 23 ऑक्टोबरला शिवसेना पक्षात प्रवेश होणार असल्याचं समजतंय. 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदर्ग दौ-यावर असतील. त्यावेळी निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांना कुडाळ-मालवणमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची माहिती मिळतेय. 

निलेश राणे हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार झाले होते. 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ-मालवणमधून लढण्यास इच्छुक आहेत. महायुतीत शिवसेनेला जागा सुटल्यास निलेश राणे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे.