Maharashta Assembly: महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हंबर रोजी होणार आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबईतील शिवडी मतदारसंघातील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपे आपला उमेदवार दिला नाहीय. त्यामुळे भाजपचा पाठींबा कोणाला? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवडी मतदारसंघात सभा घेत आपला पाठींबा जाहीर केला आहे. काय म्हणाले आशिष शेलार? जाणून घेऊया.
आपण इथं खुप वेळापासून बसलेला आहात पाणी देखील प्यायला नाहीत पण आपण विरोधकांना इथं पाणी पाजल्या शिवाय शांत बसायचं नाही.आज शिवडीतील जनतेसमोर आपल्या भूमिकेबद्दल खुलासा झाला पाहिजे. शिवडी विधानसभेच्या जागेवर महायुतीचा उमेदवार द्यायचा पण इथं आपला उमेदवार नाही. मुंबईतील 36 पैकी 35 ठिकाणी उमेदवार आहेत. इथं उबाठा आणि मनसेचे उमेदवार आहेत मग आपण काय करायच? मतदान करणाऱ्या सर्वांच्या डोक्यात सुरु असल्याचे शेलार म्हणाले. ज्यांना या विधानसभेचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी 2014 आणि 2017 चा अभ्यास करायला पाहिजे. त्यात आम्ही 10 दिवसात अनेक मतं घेऊ शकलो. नगरपालिकेच्या निवडणुकीतदेखील आपण यश मिळवलं. आताही भाजपा जी भूमिका घेईल त्याचच यश निश्चित असल्याचे ते म्हणाले. आम्हाला सर्व विचारत आहेत साहेब एकदा भूमिका सांगा. गावाकडे लग्न सुरु आहे आणि आम्हाला नाचता येईना, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.
एका अपक्ष उमेदवाराने सोशल मीडियावर भाजपचे समर्थन आहे असं दाखवत होता. त्याला आपला पाठिंबा नसल्याचे शेलार म्हणाले. परस्पर भूमिका घेतली. पण 'अरे बाबा तू बोलशील की नाही?' कोणतीही चर्चा न करता पक्षाची भूमिका कशी देणार? असा प्रश्न उपस्थित करत अपक्ष उमेदवाराला पाठीबा नसल्याचे शेलार म्हणाले.
मी आता फक्त शिवडी मर्यादित बोलत आहे. ते राज्यभर घेऊन जाऊ नका. मी माहीम बद्दल बोललो आणि महाराष्ट्रभर घेऊन गेले.आता भूमिका केवळ शिवडी मर्यादित असेल. एक तर अजय चौधरी नाहीतर बाळा नांदगावकर. आणखी काही पर्याय तर नाहीत.नोटा आपला विषय नाही. हा लोकशाहीचा उत्सव असल्याचे शेलार म्हणाले.
विचारधारेवर आपल्याला पुढे चालायच आहे. काही जुने मित्र आहेत. त्यांनी आपल्याला संपर्क केला नाही.पण उद्धवजी तुम्ही दगाबाजी केलीत.महाराष्ट्राच्या इतिहासात दगाबाज म्हणून नोंद ठेवायची तर उद्धवजी तुमचं नाव पहिल येईल. उद्धवजी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला गेले पण शिवडीतील वारकऱ्यांकडे दुर्लक्ष केल तर पंढरपूरला जाऊनही पांडुरंगाच्या पायाला हातही लावला नाही. तुळशीची माळ माझ्या गळ्यात पडली तर स्वर्ग सुखाचा आनंद होतो पण उद्धवजी यांनी ती माळ स्वीकारली नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. कोरोना काळात उद्धवजी यांनी मंदिर बंद केली. गर्दी होऊ नये म्हणून केली मान्य आहे. पण रेशन दुकानात खडुने गोल करून लोक रेशन घेत होते. मग दर्शन का घेऊ शकत नव्हते? असा प्रश्न शेलारांनी विचारला.
शिवडी मतदार संघात भाजप मनसे बाळा नांदगावकर यांना पाठींबा देणार अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली. नांदगावकर यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचे असल्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. महाराष्ट्रात नाही तर केवळ शिवडी मर्यादित आमचा पाठिंबा असल्याचे ते यावेळी म्हणाले.