Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
27 Nov 2024, 16:33 वाजता
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला... मोदी-शाहांना शिंदेंनी निर्णय कळवला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला..शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा राहिला नाही..'भाजप जो निर्णय घेईल तो शिवसेनेला मान्य असेल'..'भाजप जो मुख्यमंत्री ठरवेल त्याला पाठिंबा'...'मोदी-शाह निर्णय घेतील त्याला समर्थन असेल'..एकनाथ शिंदे यांची माहिती
27 Nov 2024, 13:16 वाजता
खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Delhi Sanjay Raut : मोदी,शहांनी डोळे वटारले की राजकारणात काहीही व्हायचं मात्र आता एकनाथ शिंदेवर डोळे वटारले तर एकनाथ शिंदे त्यांच्यावर डोळे वटारतायत हे पहिल्यांदाच पाहिल्याचं संजय राऊतांनी आज झी २४ तासशी बोलताना सांगितलं, दरम्यान यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिलीय. शिंदेंची ताकद तुम्ही ओळखली नाही, त्यांची ताकद तुम्हाला आज कळली, अशा ताकदीला तुम्ही सलाम केला पाहिजे असा टोला शिरसाटांनी राऊतांना लगावला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Nov 2024, 13:07 वाजता
शिवसेना UBT मविआतून बाहेर पडणार?
Ambadas Danve : विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शिवसेना UBT मविआतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालीय.. उद्धव ठाकरेंनी विजय आणि पराभूत उमेदवारांची चर्चा केलीय.. त्यातील बहुताश नेत्यांनी शिवसेनेनं स्वबळावर लढवा अशी भूमिका घेतल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिलीय.. अनेक त्यांनी स्वबळावर लढवावं असं सांगितल्याचं दानवे म्हणालते..
27 Nov 2024, 12:53 वाजता
यशाचं डिझाईन राष्ट्रवादीचंच - अमोल मिटकरी
Amol Mitkari : विधानसभेत मिळालेल्या यशाचं डिझाईन हे राष्ट्रवादीचंच असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय...अजितदादांच्या अखंड मेहनतीनं कमावलेलं हे यश आहे...डिझाईन बॉक्स वाले अरोरा यशाचं श्रेय घेताहेत असं मिटकरींनी म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Nov 2024, 12:28 वाजता
सुनील तटकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
Sunil Tatakre Meeting Devendra Fadanvis : राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. फडणवीस यांच्या सागर बंगला या शासकीय निवासस्थानी सुनील तटकरेंनी फडणवीसांशी चर्चा केलीय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल तटकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केल्याची माहिती मिळतेय.
27 Nov 2024, 11:51 वाजता
संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच?
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार सस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनं दिलीय, आतापर्यंत हे पालकमंत्रिपद शिवसेनेकडं होतं. त्यामुळे हे शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी आहे. त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघेही पालकमंत्री पदावर अडून बसलेलेत, असं सूत्रानं म्हटलंय. तर दुसरीकडं भाजपनेसुद्धा पालकमंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती मिळतेय. अतुल सावे यांना आता पालकमंत्रिपद मिळायला हवं अशी भाजपची भूमिका असल्याचं सूत्रानं म्हटलंय. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये पालकमंत्रिपदांवरून रस्सीखेच निर्माण झाल्याचं दिसतंय.
27 Nov 2024, 11:27 वाजता
काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं - आशिष देशमुख
Ashish Deshmukh On Congress MLA : महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असा खोचक टोला सावनेरचे नवनिर्वाचित भाजपचे आमदार आशिष देशमुखांनी लगावला आहे. आशिष देशमुखांनी तुलनात्मक आकडेवारी सादर करत काँग्रेसला खोचक सल्ला दिलाय.
27 Nov 2024, 11:06 वाजता
पुण्यात बाबा आढाव उद्या आत्मक्लेश उपोषण करणार
Pune Baba Adhav : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आत्मक्लेश उपोषण करणारेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत उद्या महात्मा फुले वाडा इथे हे आत्मक्लेश उपोषण होणारेय. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप घेत नाही हे अनाकलनीय आहे असं मत बाबा आढावा यांनी व्यक्त केलंय...
27 Nov 2024, 10:33 वाजता
पुण्यातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
Pune Candidate Deposit : पुण्यातील तब्बल २५९ उमेदवारांचे डिपॉझिट विधानसभा निवडणुकीत जप्त झालंय... २१ विधानसभा मतदारसंघात तब्बल 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालंय...सर्वात जास्त इंदापूर मधील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Nov 2024, 10:21 वाजता
Koregaon-Bhima Case : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचां अंतिम युक्तिवाद सध्या सुरू आहे. पोलिसांनी केलेली कारवाई योग्य होती, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर केला. कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ एका भागात झाली नाही. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य भागातदेखील झाली. मात्र, पोलिसांना दंगली कशा हाताळायच्या याची माहिती असते. नियमावलीप्रमाणेच पोलिसांनी कारवाई केली, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यांनी केलाय. आयोगासमोर 53 जणांची साक्ष नोंदवण्यात आलीय. या प्रकरणाची सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणारेय
बातमीचा व्हिडीओ पाहा -