Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE 20 February 2025 in Marathi:<Summery>महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. वाचा राजकारण, मनोरंजन, कला, क्रीडा, व्यवसाय, गुन्हेगारी वृत्त, या आणि अशा विविध क्षेत्रातील तसेच, मुंबई-महाराष्ट्रासहीत देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी. बातम्यांचे वेगवान LIVE अपडे्स फक्त झी २४ तास वर... 

Feb 20, 2025, 19:19 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Feb 2025, 19:18 वाजता

नाशिक जिल्हा न्यायालयासमोर दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

 

Nashik : नाशिक जिल्हा न्यायालयासमोर दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झालीये.. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुष एकमेकांना भिडले होते.. यावेळी जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठा गोंधळ उडाला होता... पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ थांबवलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2025, 18:27 वाजता

धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजार

 

Dhananjay Munde : सध्या सतत चर्चेत असलेले अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराची लागण झाली आहे. यावर उपचार सुरु असल्याची माहिती, धनंजय मुंडेंनी ट्विट करुन दिली. बेल्स पाल्सीमुळे आपल्याला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही. त्यामुळे आपण कॅबिनेट बैठक, तसंच जनता दरबार आणि इतर कार्यक्रमांना हजर राहू शकलो नाही असंही मुंडेंनी म्हंटलंय. तसंच आजारावर मात करुन लवकरच जनसेवेत रुजू होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

20 Feb 2025, 16:05 वाजता

सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

 

Gold & Silver Price : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा प्रचंड वाढ झालीये.. सोन्या चांदीने आतापर्यंतचे सर्वाधिक दर गाठलं आहे...सोनं  90 हजाराच्या उंबरठ्यावर तर चांदी 1 लाख 2 हजार रुपये प्रतिकिलो झालाय..

20 Feb 2025, 14:17 वाजता

लाडकी बहीण म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना लाच- राजू शेट्टी

 

Raju Shetty on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना लाच'... लाडकी बहीण योजनेवरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा... मोठ्या खर्चामुळे अनेक योजनांना कात्री-राजू शेट्टी.. 'अजित पवारांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर करावा'..लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना लाच दिली असं म्हणत शेट्टींनी सरकारला फटकारलय. मोठ्या खर्चामुळे अनेक योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आलीय असं म्हणत अजित पवारांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर करावा अशी मागणीही शेट्टींनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

20 Feb 2025, 13:19 वाजता

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा

 

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा...कागदपत्रं फेरफार प्रकरणी शिक्षा...कोकाटेंचा भाऊ सुनील कोकाटेही दोषी...2 वर्षांचा कारावास, 50 हजारांचा दंड...नाशिक जिल्हा न्यायालयाची शिक्षा...1995च्या कागदपत्र फेरफार प्रकरणी शिक्षा

20 Feb 2025, 13:02 वाजता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीव मारण्याची धमकी

 

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदेंची कार बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीये..मंत्रालयात आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ई-मेल देण्यात आलाय....पोलिसांकडून धमकी देण्याऱ्याचा शोध सुरू

 

20 Feb 2025, 12:38 वाजता

मुंबईतील दादरमध्ये 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त

 

Dadar 10 Crore Drugs Seized : मुंबईतील दादरमध्ये 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त..ड्रग्जप्रकरणी दोघांना अटक...एक आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती...दया नायक यांच्या पथकाची मोठी कारवाई

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

20 Feb 2025, 12:28 वाजता

शिवसेना-भाजपात पुन्हा जुंपणार?

 

Shivsena Vs BJP Dispute? : एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक प्रकल्प फडणवीसांच्या रडारवर...९०० कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता...जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंच्या काळात मिळाली होती गती... शिवसेना UBTचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती..अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको प्रशासनाला आदेश

बातमीचा व्हिडीेओ पाहा-

 

 

20 Feb 2025, 11:32 वाजता

फडणवीसांचा शिंदेंना आणखी एक धक्का?

 

Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का दिलाय...मुंबई महापालिकेतील घन कचरा व्यवस्थापनाचे १४०० कोटींचे टेंडर रद्द करण्यात आलंय..4 वर्षांसाठी काढलं होतं टेंडर...प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदा मागवल्या होत्या... सध्या हे काम 450 हून अधिक महिला बचत गटा आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केले जाते. या प्रकल्पाविरोधात आंदोलनही उभारण्यात आलं होतं.. तसेच प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आलीय..पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावे यासाठीही वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचा आऱोप करण्यात आलाय.. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत.हा एकनाथ शिंदेंसाठी धक्का मानला जातोय.. 

20 Feb 2025, 11:21 वाजता

स्कूल बसची भाडेवाढ कायम

 

School Bus Charges Hike Decision : स्कूल बसची १८ टक्के भाडेवाढ मागे घेतली जाण्याची शक्यता मावळलीये.. भाडेवाडीचा निर्णय मागे घेण्यास बस मालक संघटनांनी नकार दिलाय. अवैध खासगी वाहतूक रोखण्यास महायुती सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप या बस मालक संघटनांनी केलाय. सरकारने एकीकडे अवैध खासगी वाहतुकीला मोकळे रान दिले आहे, तर दुसरीकडे रस्त्यांचे जागोजागी खोदकाम केले आहे. याचा मोठा आर्थिक फटका बसल्याने आम्ही भाडेवाढ मागे घेणार नाही, असा पवित्रा स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा-