Maharashtra Breaking News Live Updates : भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय खलबतं, सामान्यांच्या जीवनावर कसा होणार परिणाम? वर्षातील शेवटच्या महिन्याची सुरुवात नेमकी कशी? पाहा...   

Maharashtra Breaking News Live Updates : भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

Maharashtra Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उत्सुकता आहे ती म्हणजे सत्तास्थापनेची. याच सत्तास्थापनेपूर्वी राज्यात राजकीय नाट्याचे कैक अंक पाहायला मिळाले. त्यात आता पुढचा अंक कोणता आणि राज्यातील इतर कोणत्या घडामोडी सामान्यांचं लक्ष वेधणार? पाहा सर्व Live Updates...

2 Dec 2024, 13:02 वाजता

महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा

महाराष्ट्र विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे.  गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

2 Dec 2024, 13:01 वाजता

एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द, डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला 

महाराष्ट्राचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे शिंदेनी आयोजित केलेली ही बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे ठाण्यातच असतील. 

2 Dec 2024, 12:33 वाजता

मतदानानंतर मतपत्रिकेचा फोटो काढणारा पोलीस निलंबित

शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रियाझ पठाण यांना करण्यात आलं निलंबित. त्यांच्या पोस्टल बॅलेट पेपरचा फोटो शेअर झाल्यानंतर निवडणूक गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबन. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात मतदान करणाऱ्या पठाणने आपल्या चिन्हांकित मतपत्रिकेचा फोटो काढून साताऱ्यातील मित्राला पाठवला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीला करण्यात आली होती सुरवात. चौकशीअंती पोलिसांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

2 Dec 2024, 12:09 वाजता

पक्षविरोधी कारवाई केली असेल तर.... शिरसाटांचा स्पष्ट इशारा

सत्तास्थापनेच्या धर्तीवर शिंदेंना त्यांचा निर्णय घ्यायचा जो आज- उद्यापर्यंत हा घेतला जाऊ शकतो, असं वक्तव्य करत मुख्यमंत्रीपदासंदर्भात तिन्ही नेत्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल ते सर्वांना मान्य असेल असं संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं. खातेवाटप हा एका प्रक्रियेचा भाग असल्याचं ते म्हणाले. 

2 Dec 2024, 11:45 वाजता

4 डिसेंबर ठरणार महत्त्वाचा दिवस... 

भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यासाठी पक्षाची बैठक दिनांक 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचं सूत्रांनी म्हटल आहे. या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून दिल्लीहून माजी अध्यक्ष केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह आणखी एक भाजपचे ज्येष्ठ नेते मुंबईत दाखल होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत आज संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

 

2 Dec 2024, 11:17 वाजता

एकनाथ शिंदे सत्तेत यायला तयार नव्हते, पण...  भरत गोगावलेंचा मोठा दावा

महायुतीच्या नवीन सरकार मध्ये सत्तेत येण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार नव्हते अशी माहिती आता समोर आलीय. शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार भरत गोगावले यांनीच ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये काम करायला नव्हते मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं त्यांनी सांगितलं होतं पण आम्ही त्यांना सत्तेत राहून काम करण्याचा आग्रह केला असं गोगावले यांनी सांगितलं. 

2 Dec 2024, 11:13 वाजता

शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली

सत्तास्थापनेआधी राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली. 4 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता. येत्या नव्या मंत्रिमंडळात 4 नव्या आमदांराची वर्णी लागण्याची शक्यता. आज वर्षावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक. दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मनाली जातेय. 

2 Dec 2024, 10:32 वाजता

शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक. आज दुपारी ही महत्वाची बैठक वर्षा किव्हा ठाणे होणार असल्याची सूत्रांची माहिती. या बैठकीत प्रामुख्याने पाहिले टर्म तरी मुख्यमंत्री पद मिळावे किव्हा गृहमंत्री पद मिळावे यावर महत्वाची चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. या बैठकित मुख्यमंत्री जागा वाटप त्याचसोबतच महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करतील. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला 13 मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

2 Dec 2024, 10:27 वाजता

राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. 'कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवा. हिंदूवरील हल्ल्यांसाठी मोदींचं धोरण जबाबदार. जगभरातील हिंदू संकटात' म्हणत राऊतांनी आळवला नाराजीचा तीव्र सूर 

 

2 Dec 2024, 10:08 वाजता

श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अजित पवारांच्या भेटीला

श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी घेतली अजित पवारांची भेट. श्रीगोंदा मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे शरद पवार गटाकडून जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल जगताप वेगळा निर्णय घेण्याच्या तयारी. देवगिरीवर झालेल्या भेटीनंतर चर्चांना उधाण.