Maharashtra Breaking News Live Updates : भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय खलबतं, सामान्यांच्या जीवनावर कसा होणार परिणाम? वर्षातील शेवटच्या महिन्याची सुरुवात नेमकी कशी? पाहा...   

Maharashtra Breaking News Live Updates : भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

Maharashtra Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उत्सुकता आहे ती म्हणजे सत्तास्थापनेची. याच सत्तास्थापनेपूर्वी राज्यात राजकीय नाट्याचे कैक अंक पाहायला मिळाले. त्यात आता पुढचा अंक कोणता आणि राज्यातील इतर कोणत्या घडामोडी सामान्यांचं लक्ष वेधणार? पाहा सर्व Live Updates...

2 Dec 2024, 19:57 वाजता

भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला 

भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आहेत. महाजन शिंदेंच्या निवास स्थानी पोहोचले असून यांच्यात सत्ता स्थापनेबद्दल महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

2 Dec 2024, 19:45 वाजता

भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला 

भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आहेत. महाजन शिंदेंच्या निवास स्थानी पोहोचले असून यांच्यात सत्ता स्थापनेबद्दल महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

 

2 Dec 2024, 19:14 वाजता

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर पालघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल 

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर 24 तासानंतर पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू अतिश मोरे यांना मारहाण केल्या प्रकरणात अविनाश जाधव यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल झालाय. तर अविनाश जाधव हे यात मुख्य आरोपी आहेत. या सर्वांवर कलम 118 (१) , 189 (2 ), 189 (4) 191 (2) , 191 ( 3) प्रमाणे सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रविवारी झालेल्या वादामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. सातपाटी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे .

2 Dec 2024, 16:44 वाजता

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी शरद पवार 

21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. 70 वर्षांनी दिल्लीत होणार्‍या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी शरद पवार असणार आहेत.  शरद पवार यांनी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले होते. आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारल आहे. 

2 Dec 2024, 15:00 वाजता

आझाद मैदानावर शपथविधीच्या तयारीला सुरुवात, एकूण 3 स्टेज उभारणार 

महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निकालांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यावर आता नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. या शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाली असून यासाठी एकूण 3 स्टेज बांधण्यात येणार आहे. मुख्य मंच हा 60 बाय 100 फुट असून उजव्या आणि डाव्या बाजुला 60 बाय 50 चे दोन मंच असणार आहेत. उजव्या बाजूच्या मंचावर संत - महंत , सन्मानीय व्यक्ती असतील तर डाव्या बाजुला महापुरुषांच्या प्रतिमा - सांस्कृतिक कार्यक्रम होतील.आझाद मैदानावर होणाऱ्या या भव्य शपथविधीसाठी 30 ते 40 हजार आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. मंचासमोर आमदार-खासदार, निमंत्रीत, व्हिव्हीआयपी असून परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल. तर या सोहळ्यात सर्वसामान्यांच्या प्रवेशाकरता 3 प्रवेशद्वार असतील. 

2 Dec 2024, 14:59 वाजता

महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा

महाराष्ट्र विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे.  गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

2 Dec 2024, 13:41 वाजता

मुख्यमंत्री भाजपचाच, पण गृहखातं...; काय म्हणाले छगन भुजबळ? 

ज्या गृहखात्यावरून महायुतीमध्ये सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे चे गृहखातं अडचणीचं असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. 'हे खातं चांगलं असलं तरीही अडचणीचं. माझ्यावेळी अशीच परिस्थिती होती', असं म्हणत महायुतीत सत्तास्थापनेवरून चर्चेतून प्रश्न सोडवत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार या बातमीला दुजोराही दिला. 

2 Dec 2024, 13:25 वाजता

उपमुख्यमंत्रीपदावरून श्रीकांत शिंदे यांची लक्षवेधी पोस्ट... 

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असं श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं. 

2 Dec 2024, 13:18 वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हेल्मेट शिवाय प्रवेश नाही 

राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यात हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश जारी केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर महापालिकेतील कर्मचारी हे हेल्मेटविना असतील, तर प्रवेश दिला जात नव्हता. आता मात्र प्रशासनाने महापालिका भवनात येणाऱ्या सर्वांनाच हेल्मेट सक्ती केली आहे.

 

2 Dec 2024, 13:02 वाजता

एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द

एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्यात अशी सूत्रांनी माहिती दिलीय. एकनाथ शिंदे यांनी आज आमदारांची बैठक बोलावली होती, तेदेखील रद्द करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिल्यामुळे आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी (1 डिसेंबर) ला एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरे गावहून ठाण्यात परले आहेत. ते दरे गावाला गेले असताना त्यांची प्रकृती खराब झाली होती.