मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीला लोकमतच्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यामध्ये 'शेरशाह' चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. यावेळी कियाराने आभार व्यक्त करताना मराठीमध्ये संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कियाराचा सन्मान करण्यात आला. यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे लोकमत समूहाचे संचालक विजय दर्डा यांनी राजकारणात येण्याबाबत कियाराला एक प्रश्न केला. (Kiara Advani of Bollywood made a big statement about Shinde group joining BJP latest marathi news)
तुला जर राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायला सांगितलं तर तू कोणत्या पार्टीमध्ये प्रवेश करशील?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या?, असा प्रश्न विजय दर्डा यांनी केला. भर मंचावर असा काही प्रश्न विचारला जाईल असा विचारही कियाराने केला नसेल.
सर्व प्रेक्षकांच्या नजरा कियाराकडे खिळल्या होत्या, ती काय उत्तर देते याची अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र तितक्यात अभिनेता रणवीर सिंग तिच्यासाठी धावून आलेला दिसला. तो तिला खाली बोलावून घेत होता. माईक चालत नाही, बंद असल्याचं रणवीर म्हणाला. अखेर, मी अभिनेत्री म्हणून ठिक असल्याचं कियारा म्हणाली. यादरम्यान मंचावर एकच हशा पिकला.
दरम्यान, मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी असल्याचं कियारा मराठीमध्ये म्हणाली. कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या सोहळ्यामध्ये प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत.
नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं तो तुमचा आणि मतदारांचा आदर आहे. 2019 ला हा आदर व्हायला पाहिजे होता. आम्ही सेना-भाजप युती म्हणून लढलो होतो आणि आम्हाला बहुमत मिळालं होतं. भाजपचे 100 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. मतदारांना वाटलं बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही, पण आम्ही तेच तीन महिन्यापूर्वी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर नानांनी आणखी एक कोंडीत पकडणारा प्रश्न केला.
मुलाखतीमध्ये, 2019 वेळी जी चूक केली ती आम्ही तीन महिन्यांपूर्वी सुधारल्याचंं शिंदे म्हणाले. त्यानंतर नानांनी ही चूक सुधारायला अडीच वर्षे का लागलीत, असा सवाल नानांनी केला. यावर, नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं तो तुमचा आणि मतदारांचा आदर आहे. 2019 ला हा आदर व्हायला पाहिजे होता. आम्ही सेना-भाजप युती म्हणून लढलो होतो आणि आम्हाला बहुमत मिळालं होतं. भाजपचे 100 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. मतदारांना वाटलं बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही, पण आम्ही तेच तीन महिन्यापूर्वी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.