Indapur Crime News : एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिस तपासात त्याने हत्येची कबुली दिली आहे. हत्येमागे त्याने पोलिसांनी दिलेले कारण अत्यंत धक्कादायक असे आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला गजाआड केले आहे (Crime News).
इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील मदनवाडी परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी काळु उर्फ दादा श्रीरंग पवार ( वय 40 वर्षे) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
गळा दाबून केली हत्या
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. भिगवण पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे.
आरोपी दादा श्रीरंग पवार आणि मृत महिला यांच्यात अनैतिक प्रमेसंबध होते. आरोपी प्रियकरापेक्षा मृत महिला सात वर्षांनी मोठी होती. मृत महिला विवाहीत असून तिला मुलगा देखील आहे. दोघांमध्ये पैशांचे देखील व्यवहार झाले होते. मृत महिला आरोपीकडे दिलेले पैसे परत मागत होती. तिने आरोपीकडे पैशांचा तगादा लावला होता. तसेच ती आरोपीकडे माझा आणि माझ्या मुलाचा सांभाळ कर अशी मागणी देकील करत होती. मात्र, आरोपी या महिलेची तसेच तिच्या मुलाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हता. यावरुन मृत महिला आणि आरोपी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
याच वादातून आरोपीने महिलेची गळा दाबून हत्या केली. तसेच तिच्या मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. अधर्वट जळालेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळून पोलिसांनी. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या काही तसांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.