कल्याणमध्ये वीज बिल थकबाकीमुळे सिग्नल यंत्रणेची कापली वीज

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याचा प्रकार समोर  आला आहे. 

Updated: Aug 6, 2021, 08:48 AM IST
 कल्याणमध्ये वीज बिल थकबाकीमुळे सिग्नल यंत्रणेची कापली वीज

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याचा प्रकार समोर  आला आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील सिग्नल यंत्रणेचा पुरवठा खंडीत केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. 

तर सिग्नल यंत्रणेचे व्यवस्थापन असणाऱ्या स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. 

कल्याण - डोंबिवलीत गेल्या वर्षभरापासून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महत्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यानुसार कल्याणमधील महत्वाचा  रस्ता असणाऱ्या  लालचौकी परिसरातही सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र वीजबिल बाकी असल्याचे सांगत महावितरणने त्याचा वीजपुरवठा खंडीत  केल्याची माहिती समोर आली आहे.

लालचौकी येथील सिग्नलचे 136 दिवसांचे 11 हजारांचे बिल असून ते न भरल्याने सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणच्या  अधिकाऱ्यांनी दिली. 

 

 

 

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x